Media & Press Coverage

Newspaper Coverage

Daily Republican Guard

दैनिक रिपब्लिकन गार्ड

June 3, 2026

उन्नतीशील महिला मंडळ नांदेड संचलित राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

Vatanwala

वतनवाला

June 5, 2026

व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू विरोधी दिनसाजरा

Ek Mat

एकमत

November 19, 2025

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

Event Reports

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रेनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सामाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नतीशील महिला मंडळ नांदेड संचलित राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्यामार्फत व्यसनमुक्ती बद्दल जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम माळेगाव येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप माळोदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. माळोदे साहेबांनी आपला महाराष्ट्र व्यसनमुक्त करून उत्साहापूर्वक प्रोत्साहन देऊन खूप छान काम करत आहात, असेच एक एक नवतरुण व्यसनापासून दूर व्हावा अशी इच्छा प्रकट केली.

उपस्थित अधिकारी: श्री संदीप माळोदे (Addl. CEO), सत्येंद्र आऊलवार (Social Welfare Officer Nanded), मोरे साहेब (Social Welfare Officer Latur), श्रीमती पुष्पलता कापुरे, श्री रवी कापुरे, संग्राम चव्हाण, सूर्यकांत मठपती, सतिश ढगे, दत्तकृपा संगीत संच

उन्नतीशील महिला मंडळ नांदेड संचलित राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक व हायस्कुल शाळा आष्टुर ता. लोहा जि. नांदेड येथे मंगळवारी व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. केंद्राचे प्रकल्प अधिकारी रवि कापुरे यांनी व्यसनामुळे होणाऱ्या नवतरुणांच्या जीवनावरील दुष्परिणाम सांगितले, त्या बद्दलचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक व शारीरिक नुकसान याबद्दल सखोल माहिती सांगून विद्यार्थी मित्रांची व्यसनापासून दूर राहण्यासाठी शपथ घेतली.

उपस्थित अधिकारी: शिवाजी टोम्पे (Headmaster/President), रवि कापुरे (Project Officer/Chief Guest), संग्राम चव्हाण, सतिश ढगे, सतिश गोत्राम, सविता बोराडे, गजानन शिंदे